राज्य मराठी चित्रपट पुरस्कार विजेता   

’हलगट’ १८ एप्रिलला प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीच्या कथांची उणीव असताना एक वेगळी, थरारक आणि हटके कथा घेऊन ’कर्नन फिल्म्स प्रॉडक्शन’चा नवा चित्रपट ’हलगट’ १८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट गावाबाहेरच्या एका धोकादायक समुदायाची कथा उलगडतो. या टोळीचा क्रूर प्रमुख आणि त्याच्या विरोधात उभा राहणारा बंडखोर - या संघर्षाच्या छायेत एक नाजूक प्रेमकथा फुलते. लुटीचा खेळ, विश्वासघात, आणि सुटकेच्या प्रयत्नात सगळं काही बदलत जातं. शेवटी जे घडतं ते धक्का देणारं असतं, पण ते खरंच शेवट असतो का, की फक्त एका नव्या प्रवासाची सुरुवात? उत्तर अनुत्तरित राहतं. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक करण सुमन अर्जुन आहेत.अभिजीत कुलकर्णी यांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. चित्रपटात मंगेश रंगनाथ कांगणे, अभिजीत कुलकर्णी, सुप्रिती शिवलकर, आणि अतिश लोहार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Related Articles